Sunday, 20 Oct, 8.04 pm थोडक्यात

महाराष्ट्र
धनंजय-पंकजा वादात बीड जिल्ह्यातला हा भाजप उमेदवार अडचणीत!

बीड | बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंचा निषेध व्यक्त करताना त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यासंदर्भात त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आहे.

धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंसंदर्भात केलेलं वक्तव्य लक्षात ठेऊन गावागावातून मतदानातून निषेध करा. ततंच गावागावात त्यांचे पुतळे जाळून निषेध करा आणि निषेध व्यक्त करताना कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून राष्ट्रवादीला जिल्ह्यातून हद्दपार करा, असं वक्तव्य त्यांनी केलंय आणि त्यांच्या याच वक्तव्यावर बाळासाहेब आजबे बोट ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आदर्श आचारसंहिता सुरू असताना आणि प्रचाराची मर्यादा संपलेली असताना भीमराव धोंडे यांनी जाहीर भाषणामध्ये केलेले वक्तव्य हा आचारसंहितेचा भंग आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

दरम्यान, आदर्श आचारसंहितेचा भंग झाला असेल तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आष्टी मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी नम्रता चाटे यांनी सांगितलं आहे.

जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर!

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे आघाडीवर!

पंकजा ताईंचं आणि माझं रक्ताचं नातं- धनंजय मुंडे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top