Thursday, 08 Apr, 3.12 pm थोडक्यात

होम
धोनीनं दिला 'तो' सल्ला अन् नटराजनचं नशिबच बदललं

मुंबई | नुकतेच आपल्या चमकदार कामगिरीनं गोलंदाज टी नटराजन याने भारतीय संघात स्थान मिळवलं होतं. बुमराहनंतर भारतीय संघात जर कोण यॉर्कर स्पेशालिस्ट असेल तर तो नटराजन आहे. नटराजन एका षटकातील सहाच्या सहा चेंडू याॅकर टाकण्याची क्षमता ठेवतो. मागील वर्षी नटराजनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. धोनीच्या सल्ल्याने त्याला ही कामगिरी करता आली, असं नटराजन याने सांगितलं आहे.

धोनीसारख्या खेळाडूशी बोलायची संधी मिळणे हीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. त्याने मला फिटनेसबद्दल सांगितलं आणि प्रोत्साहन दिलं. जसा जसा अनुभव येईल तशी तशी चांगली गोंलदाजी करशील, असं देखील त्याने सांगितलं. स्लो बाऊन्सर आणि कटर यांसारख्या गोष्टींचा गोलंदाजी करताना वापर केल्यास ते माझ्यासाठी उपयुक्त ठरेल असं धोनीने सांगितलं होतं, असं नटराजन म्हणाला.

नटराजन सध्या आयपीएलमध्ये सनराझर्स हैदराबादकडून खेळतो. मागील वर्षी त्याने हैदराबाद आणि चेेन्नईच्या एका सामन्यात धोनीचा त्रिफळा उडवला होता, त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलं होतं. पण त्याल राखीव म्हणून बसाव लागलं होतं. त्यानंतर इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली. त्यात त्याने संघासाठी चांगली कामगिरी करून दाखवली होती.

दरम्यान, सनराझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 11 एप्रिलला सामना होणार आहे. या सामन्यात नटराजनवर विरोधी संघाला बाद करण्याची जबाबदारी असेल. तसेच डेथ ओव्हरमध्ये संघासाठी तो एक महत्वाचा गोलंदाज आहे.

थोेडक्यात बातम्याा-

'कडवट शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण बाळासाहेबांची खोटी शपथ घेणार नाही'

मित्रांनी आपल्याच मित्रावर केला हल्ला; बेदम मारहाणीमुळे 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे- हसन मुश्रीफ

'आतापर्यंत मी गप्प राहिलो, पण माझं मौन हे कुणी माझी कमजोरी समजू नये'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top