होम
एड्स मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल, समोर आली आनंदाची बातमी!

नवी दिल्ली | एचआयव्ही बाधित झाल्यानंतर त्या रुग्णावर ठोस असा कोणताही इलाज आतापर्यंत उपलब्ध नव्हता. एड्स झाल्यानंतर रुग्णाला देण्यासाठी कोणतीही लस किंवा विशिष्ट औषध या जगात उपलब्ध नव्हतं जेणेकरून एचआयव्हीबाधित रुग्ण त्या रोगातून मुक्त होईल.
जगभरात गेल्या कित्येक वर्षांपासून एड्स रोगाच्या लसीचा शोध सुरू आहे. पण आतापर्यंत कोणालाही यश आलं नव्हतं. परंतु आता एड्सवर प्रभावी असणारी लस मिळण्याची शक्यता आहे. जगामध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे, त्याच पार्श्वभूमीवर एचआयव्हीबाबत आलेल्या या बातमीने आरोग्य क्षेत्रात काही प्रमाणात आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
नॉन प्रॉफिट ड्रग डेव्हलपर आणि स्क्रॅिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटने फेब्रुवारी महिन्यात या लसीबाबत घोषणा केली होती. या लसीद्वारे शरीरामधील अँटीबॉडी निर्मितीसाठी मदत होणार असून नवीन सेल्स उत्पादन याद्वारे वाढेल असं संशोधनातून समोर आलं आहे.
एचआयव्हीवर येणाऱ्या या लसीची घोषणा झाली असली तरी अजून या लसीला अनेक टप्पे पार करायचे आहेत. तसेच या लसीमुळं संपूर्ण जग एड्स मुक्त होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या लसीची पहिली चाचणी झाली असून यापुढे होणाऱ्या चाचण्यात नेमका काय परिणाम दिसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या -
'फडणवीसांनी कोणत्या जिल्ह्यात लसींचा साठा सर्वाधिक आहे ते दाखवून द्यावं'; जयंत पाटलांचा पलटवार
पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार; नितीन गडकरींनी केली 'ही' मोठी घोषणा
'जाणीवपूर्वक लसीकरण बंद करून, लसींच्या बाबतीत चुकीच्या बातम्या पसरविण्याचं कारण काय?'
'केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी'; नाना पटोले आक्रमक