Friday, 24 Sep, 12.04 pm थोडक्यात

होम
"एक दिवस सगळे संघ पाकिस्तानात खेळायला येतील"

इस्लामाबाद | पाकिस्तनमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्यानं न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. यानंतर जगभरातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत. अशातच आता पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांंनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एक दिवस आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्व खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळायला येतील, असं म्हटलं आहे.

याविषयी बोलताना शेख रशीद म्हणाले की, न्यूझीलंडमध्ये फौज नसेल एवढं सैन्य आम्ही न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी तैनात केलं होतं. इंग्लडने दौरा रद्द केला तेव्हाच न्यूझीलंड देखील दौरा रद्द करेल याचा अंदाज आला होता.

या दोन्ही देशांनी दौरा रद्द केल्यानंतर त्यांना वाटलं असेल की, पाकिस्तान आता एकटा पडेल. परंतु हा त्यांचा गैरसमज आहे. एक दिवस असा येईल की, जेव्हा आंतराष्ट्रीय स्तरावरील सर्व संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास येतील, असा मला विश्वास आहे, असं शेख रशीद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी रशीद यांनी भारत पाकिस्तानात दहशतवाद पसरवत असल्याचा आरोप देखील केला आहे. भारताकडून पाकिस्तानातील दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका स्वत:ला सुपर पॉवर समजू लागले आहेत, असं देखील रशीद यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या -

'या' लोकांना कोरोना लस घरीच मिळणार, केंद्राने घेतला मोठा निर्णय

शाळा सुरू करण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले.

'तुम्ही हजार वर्ष सत्ता राखा, पण.'; सुधीर मुनगंटीवार ठाकरे सरकारवर बरसले

टी-20 विश्वचषकाचं अँथम रिलीज, विराट-पोलार्ड नवीन अवतारात, पाहा व्हिडीओ

'सेना-राष्ट्रवादीच्या संगतीमुळे काँग्रेसच्या 'या' नेत्याची भाषा बिघडली'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top