Monday, 24 Feb, 11.52 am थोडक्यात

महाराष्ट्र
गरीबी-श्रीमंती, जातीपातीच्या बांधलेल्या भींती पाहण्यासाठी ट्रम्प येतायत; जयंत पाटलांनी शेअर केला फोटो

मुंबई | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज भारत भेटीवर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच ते अहमदाबादला ज्या मार्गावरुन येणार आहेत तेथील झोपडपट्टी दिसू नये म्हणून भिंत बांधण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

शोकांतिका ! 'त्यांनी' गरीबी-श्रीमंती, धर्मा-धर्माच्या, जातीपातीच्या बांधलेल्या भींती पाहण्यासाठी आज बाहेरून पाहुणे येणार आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

ट्वीटमध्ये जयंत पाटलांनी एक फोटो शेअर केला आहे. यात भिंतीच्या एका बाजूला गरिबी दिसत आहे, तर दूसऱ्या बाजूल उत्तम रस्ते आणि विकास दिसत आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी ते 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात भारतीयांना संबोधित करणार आहेत.

ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

न्यूझीलंडचा 10 गडी राखत भारतावर दणदणीत विजय

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच विरोधक आक्रमक; पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी

'नमस्ते ट्रम्प' हा देशातील ऐतिहासिक सोहळा असेल- नरेंद्र मोदी

ट्रम्प महाराष्ट्रात आले असते तर आधी 'शिवथाळी' चाखली असती- संजय राऊत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top