Friday, 28 Feb, 9.44 am थोडक्यात

महाराष्ट्र
'घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!; मनसेची 'मातोश्री'च्या अंगणात पोस्टरबाजी

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद विभागाने घुसखोरांना 'शोधून द्या आणि बक्षीस मिळवा' असं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मातोश्रीच्या अंगणातही घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना पारितोषीकाची घोषणा करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.

वांद्रे पूर्व भागात मनसे नेते अखिल चित्रेंनी हे पोस्टर लावले असून घुसखोरांची माहिती देणाऱ्यांना 5555 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांचा शोध लावण्यासाठी राज ठाकरेंची मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

'घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा! पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकललंच पाहिजे. या मोहिमेत समोर आलेल्या माहितीची शहानिशा करुन सत्यता पटल्यावर माहिती देणाऱ्यास रोख 5 हजार 555 रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असं मनसेनं पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, पुण्यातील मोहिमेत आपल्याच देशातील नागरिकांना बांगलादेशी म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यामुळे कथित बांगलादेशी भारतीयच असल्याचे समोर आल्याने मनसेच्या या मोहिमेचा फज्जा उडाला होता.

फडणवीसांच्या काळातील बळीराजा चेतना अभियानात 6 कोटी 25 लाखांचा घोटाळा; भाजप आमदाराचा आरोप

'मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल पण कारट्यानं नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली'

'सर्व मोदी चोर आहेत' वक्तव्यावर राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा

दिलदार भाईजान. कोल्हापुरमधील हे पूरग्रस्त गाव घेतलं दत्तक

दिल्ली जळत असताना अमित शहा कुठे होते?; शिवसेनेचा सवाल

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top