Wednesday, 07 Aug, 7.28 am थोडक्यात

महाराष्ट्र
गोपीनाथ मुंडेंची महती सांगत धनंजय मुंडेंची पंकजांवर बोचरी टीका; म्हणतात.

बीड | गोपीनाथराव मुंडे यांनी वैद्यनाथ कारखान्याला आपल्या काळजाप्रमाणे जपलं पण आज त्यांच्याच वारसदारांनी कारखान्याची दशा केली आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते परळीत बोलत होते.

दुष्काळात ऊस जळत असताना लोकप्रतिनिधींनी राजकारण करत शेतकऱ्याचं मन जाळलं. जाणीवपूर्वक वैद्यनाथ कारखाना उशीरा सुरू केला, ऊस उचलीसाठी पक्षभेद केला. निसर्ग कोपलेला असताना ऊसाची बिलं थकवली, असा आरोप त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केला आहे.

विश्वासाने मतांचे आंदण दिले त्याच शेतकऱ्यांना यांनी लुटले. निवडणुकांपूर्वी शे-दोनशे देऊन परळीकरांना लालूच देतील. भावनिक राजकारणाला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीआधीच परळीत वातावरण गरम व्हायला चालू झालं आहे. धनंजय यांच्या वक्तव्यावर पंकजा काय बोलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-'दळभद्री सरकारला मातीत गाडण्याची शपथ घेतलीये. माझा शेतकरी मोठा व्हावा हेच माझं स्वप्न'

-सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहताच 'MDH'च्या मालकाला अश्रू अनावर

-अजित पवारांवर टीका करणारा 'तो' बॅनर राष्ट्रवादीने जाळला!

-'मुतऱ्या तोंडाचा अजित.'; गिरीश महाजन-अजित पवार यांच्यात जुंपली!

-.अन् छत्रपती संभाजीराजे निघाले पूरग्रस्तांना मदतीला!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top