Wednesday, 19 Feb, 2.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
ही तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली; पंकजांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र

बीड | परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका व्यापाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती. या प्रकणावरुन राजकीय वातावरण तापलं असून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यात चांलगीच जुंपली आहे.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय, जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे, असं ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी टीका केली आहे.

परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफिया राज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग 'गय करणार नाही 'अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण आहे. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीड ला मिळालं हे दुर्दैव.. हे खपवून घेतलं जाणार नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असं म्हटलं आहे. तसेच वैयक्तीक वादाच्या प्रकरणात मला गोवू नका, असं ते म्हणाले आहेत.

शिवजयंतीनिमित्त सचिननं ट्विट करत महाराजांना दिली खास मानवंदना

अजितदादा आपण इतकी वर्षे उगाच वेगळे राहिलो- उद्धव ठाकरे

64MP कॅमेरा असलेला शाओमीचा हा लोकप्रिय फोन झाला आणखी स्वस्त!

'54 जागांसाठी पावसात भिजावं लागलं, त्यांनी 105 जागा जिंकलेल्यांना बोलू नये'

महान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी त्यांना नमन!; मोदींचं मराठीत ट्विट

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top