Monday, 14 Jun, 1.20 pm थोडक्यात

होम
जगातील सर्वात मोठ्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, 38 पत्नी विधवा तर 89 मुलं पोरकी

नवी दिल्ली | जगातील सर्वात मोठं कुटंब म्हणून ओळखलं जाणाऱ्या चाना परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचे प्रमुख असणारे जिओना चाना यांचे निधन झालं आहे. यामुळे त्यांच्या 38 पत्नी विधवा झाल्या असून त्यांची 89 मुलं पोरकी झाली आहेत. याबाबत मिझोरमचे मुख्यमंत्री झोरमथंगा यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

संबंधित कुटुंब हे मिझोराम येथील रहिवासी असून त्यांचं गाव त्यांच्या कुटुंबामुळे प्रसिद्ध आहे. एवढंच नाही तर त्यांच्या गावात पर्यटक विशेष त्यांच्यामुळे गावात जातात. जिओना यांच्या कुटुंबातील महिला शेती करुन घरात हातभार लावतात. यामध्ये जिओना यांची पहिली पत्नी प्रमुख भूमिका साकारते.

जिओना यांच्या पहिल्या पत्नीने इतर सर्व पत्नींना काम वाटून दिले असून ती त्यांच्यावर लक्ष ठेवते. जिओना यांना 14 सूना आणि 33 नातवंड आहे. एकूण 181 लोकांचं असलेलं हे कुटुंब 100 खोल्यांच्या घरात राहतं. हे कुटुंब घराच्या अंगणात, आजूबाजूला शेतात पालक, कोबी, मोहरी, मिरची, ब्रोकोली इत्यादी भाजीपाला पिकवतात. घरातील बागेमुळं या कुटुंबाच्या पैशाची बचत होते.

दरम्यान, जिओना चाना हे 1942 मध्ये सुरू झालेल्या ख्रिश्चन ग्रुप चानाचे प्रमुख होते. त्यांच्यामध्ये एकापेक्षा अनेक लग्न करण्यास परवानगी आहे. या समाजात आत्तापर्यंत 400 कुटुंबांची नोंद आहे. यांचा मुख्य उद्देश आहे की, जास्तीत-जास्त मुलं जन्माला घालून समाज मोठा करणं.

थोडक्यात बातम्या-

'2 वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण.'; टास्क फोर्सच्या सदस्यांचा पालकांना मोलाचा सल्ला

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं शास्त्रज्ञांचीही उडवली झोप!

'आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही'; काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा दावा

'राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे'

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top