Thursday, 27 Jun, 12.12 pm थोडक्यात

होम
जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

चंदिगड | काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते विकास चौधरी यांची दिवसाढवळ्या हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही सर्व घटना फरिदाबादमध्ये घडली आहे.

विकास चौधरी नेहमीप्रमाणे जिमला निघाले असता हल्लेखोरांनी संधी साधून त्यांच्यावर 5-6 गोळया झाडल्या. यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

विकास चौधरी यांच्यावर दोघांनी हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सध्या घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हींच फुटेज तपासलं जात आहे.

दरम्यान, भरदिवसा झालेल्या विकास चौधरी यांच्या हत्येमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या

-केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई सुरु; एकाला औरंगाबादमधून अटक

-हम दिल दे चुके सनम. मलायकानंही अखेर मान्य केलं!

-आगामी विधानसभेत भाजपच्या 30 विद्यमान आमदारांना नारळ?

-.तर मुस्लिम तरूणाचं शिर कापून टाकू; 'या' भाजप खासदाराची जीभ घसरली

-'या' मागण्यांसाठी नगरसेवकांनी काढल्या तीन रात्री सभागृहातच

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top