महाराष्ट्र
'जुनं ते सोनं'! इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतूनच केली नवरा-नवरीची पाठवणी!

अहमदनगर | इंधनाच्या दराने पाय पसरवले आहेत. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलने तर शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिश्याला कात्री लागणार आहे. अशावेळी समाजमाध्यमातून केंद्र सरकारवर जोरदार टीका होताना पाहायला मिळत आहे. विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. अशातच एका नवदाम्पत्याने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीनं निषेध केला आहे.
संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील अधिराज मुकेश काकड आणि कोल्हेवाडीतील ज्ञानेश्वरी विठ्ठल वामन यांचा विवाह रविवारी पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेले सर्व नियम पाळत, अत्यंत साध्या पद्धतीनं हा लग्नसोहळा संपन्न झाला. सर्व विधी पार पडल्यानंतर जेव्हा नववधूची पाठवणी करण्याची वेळ आली तेव्हा तिथे फुलांनी सजवलेली एखादी चारचाकी नव्हती. तर सजवलेले बैल आणि त्यांना जुंपलेली एक बैलगाडी उभी होती.
पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यामुळे सरकारचा निषेध म्हणून कोल्हेवाडी ते जोर्वे असा 5 किलोमीटरचा प्रवास या नवदाम्पत्यानं बैलगाडीतूनच केला. नव्या जोडप्यानं इंधन दरवाढीचा केलेला हा निषेध संगमनेर तालुका आणि अहमदनगर जिल्ह्यात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दरा इतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.
थोडक्यात बातम्या -
संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर.- पंकजा मुंडे
सातारा जिल्ह्यातील कुटुंब राबवत आहे पाकिस्तानात 'हा' आगळावेगळा उपक्रम
शरद पवारांनी कोरोनाची लस घेत दिला 'हा' मोलाचा सल्ला; म्हणाले.
मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत - नाना पटोले
'आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु'