दुबई | 2016 च्या स्पर्धेत आपल्या ताकदवान खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिज संघानं अंतिम षटकात सामना जिंकत विश्वविजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर आता तब्बल 5 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विश्वचषक स्पर्धा होत आहे.
पण या स्पर्धेत इंडिज संघाला गतविजेत्यांसारखा खेळ दाखवता आलेला नाही. म्हणूनच आता संघाच्या ताफ्यात दिग्गजाचा समावेश झाला आहे.
आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर वेस्ट इंडिजला अनेक सामने एकहाती जिंकून देणाऱ्या जेसन होल्डरला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. वेस्ट इंडिज संघ सध्या खेळाडूंच्या गचाळ प्रदर्शनानं दोन सामन्यात पराभूत झाला आहे. दुखापतग्रस्त गोलंदाज ओबेड मॅक्कॉयच्या जागी जेसन होल्डरला सामिल करत संघात समतोल साधण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापनानं केला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक दोन वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात वेस्ट इंडीज संघाला यश आलं आहे. पण सध्या संघाला एका विजयासाठी सुद्धा झगडावं लागत आहे. जगातील सर्वात धोकादायक फलंदाजी क्रम असलेला वेस्ट इंडीज संघ सध्या एका एका धावांसाठी झटावं लागत आहे. परिणामी आता जेसन होल्डरच्या येण्यानं संघाच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, वेस्ट इंडीजचा समावेश सध्या अ गटात आहे. अ गटाला स्पर्धेतील अवघड गट म्हणून ओळखण्यात येत आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवानंतर स्पर्धेत पुन्हा लयीत येण्याचं आव्हान सध्या वेस्ट इंडिज संघासमोर आहे.
थोडक्यात बातम्या
'अटकेपूर्वी 3 दिवस आधी.'; समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
'ड्रग्ज हे जीवनाश्यक, ड्रग्जचा वापर करण्यास परवानगी दिली पाहिजे'
मोठी बातमी! अखेर आर्यन खानला जामीन मंजूर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
'मी मागासवर्गीय असल्यामुळे.'; समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे धाव
ट्विटरवर हरभजनची गुगली! पाकिस्तानच्या महिला पत्रकाराला म्हणाला, 'गेट लाॅस्ट.'

