Thursday, 08 Apr, 2.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
कोरोना लसींंच्याबाबतीत महाराष्ट्रावरच अन्याय का? - आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. परंतु राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, मी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी बोललो, तसेच आठवड्याला 40 लाख लसी महाराष्ट्राला लागतात. त्यामुळे तसा पुरवठा करण्यात यावा अशी मागणीही केल्याचं टोपे यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्राला साडेसात लाख आणि इतर राज्यांत जास्त लसींचा पुरवठा का? असा प्रश्नही यावेळी राजेश टोपे यांनी उपस्थित केला. तसेच मला कोणाशीही वाद घालायचा नाही किंवा कोणाला दोष द्यायचा नाही असंही ते यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि पनवेल येथे कोरोना लसीचा तुटवडा झाल्यामुळे लसीकरणच बंद पडलं याची माहिती ही केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना कळवल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. इतर देशांशी आपण तुलना करतो तेव्हा दहा लाखाच्या पटीत तुलना केली जाते, पण मग त्यासाठी तेवढ्या प्रमाणात लसी देणं ही गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितलं.

महाराष्ट्र आणि गुजरातची तुलना केली असता गुजरातला 1 कोटी लसी दिल्या आणि महाराष्ट्राला 1 कोटी 4 लाख लसींचा पुरवठा झाला. लोकसंख्येच्या दृष्टीने या दोन्ही राज्यांची तुलना केली असता गुजरातची लोकसंख्या ही महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकसंख्येप्रमाणे लसींचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केली आहे. केंद्र सरकार मदत करत आहे, पण हवी तशी मदत केंद्राकडून होत नसल्याचंही राजेश टोपे यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या -

'कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top