Tuesday, 14 Jul, 3.05 pm थोडक्यात

महाराष्ट्र
कृषी विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर COVID19 चा उल्लेख नसेल- दादा भुसे

मुंबई | कोरोना काळात परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे निकाल दिला जात आहे. मात्र या गुणपत्रिकांवर कोव्हिड 19 असा उल्लेख नको, या मागणीचा आग्रह भाजपकडून केला जात आहे. याबाबत कृषी मंत्री दादा भुसेंनी स्पष्टीकरण दिलंय.

कृषी विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गुणपत्रिका किंवा सर्टिफिकेटवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल, अशी ग्वाही दादा भुसे यांनी दिली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोव्हिड 19 असा उल्लेख नसेल. आधीच्या सत्रातील परीक्षांचे गुण आणि शेवटच्या वर्षाचे 50 टक्के गुण या सूत्रानुसार निकाल जाहीर करण्यात येईल, असं दादा भुसेंनी सांगितलंय.

दरम्यान, हे निकाल जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत जाहीर होतील. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी काळजी करण्याचं कारण नाही, असं दाद भुसेंनी म्हटलंय.

काँग्रेसच्या कारवाईनंतर सचिन पायलट यांचं एका ओळीचं सूचक ट्विट, म्हणाले.

'सचिन पायलट राहुल गांधींना पुढे जड जातील म्हणून त्यांच्यावर कारवाई झालीये'

मुंबईत दुसऱ्या महिलेसोबत कारमध्ये होता पती, बोनेटवर चढून पत्नीचा हंगामा, पाहा व्हिडीओ

सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसकडून मोठी कारवाई, पायलट यांच्या भूमिकेकडे लक्ष!

इराणचा भारताला झटका; घेतला 'हा' मोठा निर्णय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top