Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, मोदींचा जवानांशी संवाद

लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतांपेक्षाही मोठं, मोदींचा जवानांशी संवाद

लेह लडाख | लडाखमधल्या सैनिकांचं शौर्य हिमालयातील पर्वतरांगांपेक्षाही मोठं आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज मोदींनी अचानक लेह लडाखचा दौरा केला. सीमेवरील सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी गलवान खोऱ्यामध्ये जी वीरता आणि शौर्य दाखवलं, त्याने संपूर्ण जगाला भारताची ताकद काय आहे? हे दाखवून दिलं आहे. भारत जल, वायू आणि जमीन सर्व ठिकाणी शक्तीमान आहे. जवानांच्या हातात देश सुरक्षित असल्याची भावना मोदींनी व्यक्त केली.

गलवान खोऱ्यातील जवांनाच्या शौर्याचा देशाला अभिमान आहे. मी कोणताही संरक्षणात्मक बाबीने विचार करताना किंवा निर्णय घेताना प्रथमत: 2 मातांचा विचार करतो.

एक म्हणजे भारतमाता आणि दुसरा म्हणजे तुम्हा जवानांच्या वीरमाता. अशा शब्दात त्यांनी जवानांचं मनोबल वाढवलं.

भारतीय सैनिकांचं समर्पण हे अतुलनीय आहे. तुम्ही ज्या कठीण काळात आणि ज्या उंच ठिकाणी भारतमातेची ढाल बनून उभे आहात त्याची तुलना जगातल्या कशाचीच होऊ शकत नाही. मी याचा आज अनुभव घेतोय आणि माझ्या डोळ्यांनी हे सगळं बघतोय, असं मोदी म्हणाले.

विस्तारवादाचं युग संपलं आहे, हे युग विकासवादाचं आहे आणि विस्तारवादावरून संपूर्ण जग आता एकवटलं आहे, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज मोदींनी थेट सीमेवर जाऊन तिथूनच चीनला ठणकावलं.

. म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार!

कोरोनाविरोधी लढ्यात पुणे महापालिकने टाकला टॉप गिअर, आता..

जवानांच्या हातात देश सुरक्षित, जगाला भारताच्या सामर्थ्याचे दर्शन, थेट सीमेवर जाऊन मोदींचं संबोधन

पंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, 'विस्तारवादाचं युग संपलं आता..'

'इंदुरीकर महाराज हाजीर हो..', अखेर महाराजांना कोर्टाची पायरी चढावी लागणार!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat