Sunday, 12 Jul, 5.29 pm थोडक्यात

होम
'लवकरात लवकर जयपूरला या.' दिल्लीत ठाण मांडलेल्या आमदारांना मुख्यमंत्री गेहलोतांचे आदेश

जयपुर | राजस्थानमध्ये मध्य प्रदेशप्रमाणे सत्तासंघर्ष पहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांसोबत दिल्ली गाठली. यामुळे गेहलोत सरकार अडचणीत आलंय. यासाठीच आता सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांनाच हजर होण्याचा आदेश दिला आहे.

'मुख्यमंत्री गेहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांना असाल तिथून निघून या आणि जयपूरला पोहोचा, असे आदेश दिलेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी यावं,' असंही आमदारांना कळविण्यात आले आहे.

राजस्थानच्या सत्तासंघर्षाप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही चिंता व्यक्त केलीये. 'आपल्या पक्षासाठी चिंतेत आहे. घोडे तबेल्यातून निघून गेले की आम्ही जागे होणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामध्ये त्यांनी राजस्थानचा उल्लेख केलेला नसून मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे, आता सचिन पायलट असे तरुण नेते काँग्रेस गमावत असल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाने यावर मौन धारण केल्याने सिब्बल यांनी बोट दाखविले आहे.

तर राजस्थानचे परिवाहन मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले की, 'गहलोत यांनी आज कॅबिनेटची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी कोणत्याही काँग्रेस आमदाराचा फोन बंद लागल्यास किंवा तो न सापडल्यास घाबरू नका. त्याच्याकडे जाऊन संपर्क साधा. सरकारला वाचवण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे, असे आदेश दिले आहेत.

रूग्णाची संख्या लपवण्यासाठी कमी चाचण्या, पण लक्षात ठेवा.., फडणवीसांचा सरकारला इशारा

'नया है वह.' म्हणत फडणवीसांनी उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली!

महाराष्ट्रातल्या या शहरात लॉकडाऊन वाढवला, आयुक्तांनी काढले आदेश

धक्कादायक! 'One Plus मोबाईल कंपनीनं कपड्यांच्या आरपार पाहता येणारा कॅमेरा बनवला, पण आता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top