Wednesday, 25 Mar, 6.04 pm थोडक्यात

होम
महाभारताचं युद्ध 18 दिवसांत जिंकलं, कोरोनाचं युद्ध 21 दिवसांत जिंकायचंय- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | मंगळवारी देशवासियांशी संवाद साधल्यानंतर आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधल्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.महाभारताचं युद्ध १८ दिवसांत जिंकलं गेलं होतं. आता आपल्याला २१ दिवसांत करोनाविरोधातील युद्ध जिंकायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी, सारथी होते. आज १३० कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला करोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे, असं मोदी म्हणाले.

करोनाच्या आजाराचा फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक तयाऱ्या केल्या जात आहेत. सर्वांना या काळात घरांमध्ये राहणं गरजेचं आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मंगळवारी देशवासियांशी संवाद साधताना त्यांनी संपूर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली गेली आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहन सध्या प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे.

'कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा'; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

प्लीज पप्पा. बाहेर जाऊ नका बाहेर कोरोना आहे; लहानग्या चिमुकल्याची पोलिस बापाला आर्त साद

मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top