Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्र विकास आघाडीचा भाजपला पहिला झटका

महाराष्ट्र विकास आघाडीचा भाजपला पहिला झटका

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा परिषदेतील दतवाड पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे तर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीचे प्रवीण माने यांनी भाजपच्या प्रमोद पाटील यांचा पराभव केला आहे.

महाआघाआडीचे उमेदवार प्रवीण माने यांना 8 हजार 1 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार प्रमोद पाटील यांना 7 हजार 396 मतं मिळाली.

दतवाड पोट निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झालं होतं. या निवडणुकीत 63 टक्के इतकं मतदान झालं होतं. या विजयानंतर महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या.

शिवसेना फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युल्यावर ठाम होती तर भाजप मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार नव्हतं. त्यामुळे दोन्ही पक्षांत तिढा निर्माण झाला आणि सेना- भाजपची युती तुटली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat