Wednesday, 20 Nov, 8.12 am थोडक्यात

होम
महिलेकडून महाराजांचा एकेरी उल्लेख; शरद केळकरने दिलेल्या उत्तराने टाळ्यांचा कडकडाट

मुंबई | बहुप्रतिक्षित 'तान्हाजी द अनसंग वाॅरिअर' चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. प्रदर्शनादरम्यान अभिनेता शरद केळकरला एका महिलेने चित्रपटाविषयी विचारताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी केला. यावेळी शरदने दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

महिलेने महाराजांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करताच शरदने त्या महिलेची चूक दुरुस्त करत छत्रपती शिवाजी महाराज असं म्हटलं. त्याच्या या उत्तराने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत एकच जल्लोष केला.

शरद केळकरच्या या उत्तराचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला लोकांची पसंती मिळत असून चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या शरद केळकरवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, 'तान्हाजी द अनसंग वाॅरिअर' चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट 3डी मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भाजपने एक पाऊल मागे यावं… याचाच अर्थ सेनेला…

भाजपने राज्यात कुणामुळे वाढलो हे विसरू नये… मतभेद…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top