Monday, 27 Jan, 10.12 am थोडक्यात

महाराष्ट्र
माझं उपोषण आक्षेपासाठी नाही अपेक्षांसाठी आहे- पंकजा मुंडे

औरंगाबाद | मराठवाड्यातील पाण्याची वणवण संपावी या प्रश्नासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आज उपोषण करणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण आक्षेपांसाठी नसून अपेक्षांसाठी केलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या उपोषणात सहभागी होणार असल्याचं कळतंय. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने हे आंदोलन होणार होतं. पणं आता ते भाजपचं आंदोलन असणार आहे.

मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न संपून समृद्धीची सत्ता स्थापन व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयत्न असणार आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या उपोषणात मराठवाड्यातील सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी भाजप नेत्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या -

'जितेंद्र आव्हाडांचं प्रेयसीपेक्षाही जास्त प्रेम शरद पवारांवर'

मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमची मुलं हिंदुस्थानी- शाहरुख खान

'त्या' आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा- इम्तियाज जलील

आधी मनसे, अन् आता काँग्रेस करतंय अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला विरोध

'त्या' आरटीआय कार्यकर्त्यांचे हातपाय तोडा- इम्तियाज जलील

'महाराष्ट्रात विठ्ठल दोनच, एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top