Saturday, 14 Dec, 8.41 pm थोडक्यात

पुणे
"मला बंधनात अडकवू नका, 'ते' गूढ मी कधीच उकलणार नाही"

पुणे | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्याला खबर न होताच सकाळी सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मला बंधन घालू नका, 'ते' गूढ मी कधीच उकलणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. फडणवीसांसोबत सरकार स्थापनेच्या अजित पवारांच्या फसलेल्या प्रयत्नाबाबत अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पुण्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसची विचारसरणी एकच आहे. शिवसेनेची विचारसरणी वेगळी आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, असं अजित पवार म्हणाले आहेत.

ज्यावेळी असं कोअ‌ॅलिशन गव्हर्नमेनंट असतं तेव्हा ज्यामधे मतमतांतर असतं ते विषय मागे ठेवायचे असतात. ज्यात लोकांचं हित असतं, महाराष्ट्राच हित ज्यात आले अशा विषयांना अग्रक्रम द्यायचा असतो.

इडा पिडा टळली… बळीचं राज्य आलं - धनंजय मुंडे

शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपची 'ही' नवी खेळी!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top