Sunday, 15 Sep, 8.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
मला निवडून द्या. परळीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन- धनंजय मुंडे

बीड | विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपलीये. परळी विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. कारण बहिण-भावामधलं असलेलं हाडवैर आणि मागच्यावेळी पंकजा मुंडेंनी केलेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी धनंजय मुंडे आतुर झालेत. आज धनंजय मुंडेंनी भावनिक साद घालत परळीकरांना मतरूपी आशीर्वाद मागितला आहे.

परळीकरांना मला जर संधी दिली तर परळीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन. तेवढी धमक माझ्यामध्ये आहे. फक्त तुमचे मतरूपी आशीर्वाद मला द्या, असंही ते म्हणाले.

तुमच्यातील पोरगा तुमच्यासाठी राबत असताना परळीची जनता म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा, अशी आर्त साद धनंजय मुंडेंनी परळीकरांना घातली आहे.

परळीच्या मातीतला माणूस आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, त्याचे दरडोई उत्पन्न दुप्पट व्हावे हे माझे स्वप्न आहे, असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top