Friday, 11 Jun, 2.28 pm थोडक्यात

होम
मालक शवासन करत असताना कुत्र्याला झाला गैरसमज, कुत्र्याने केलं अस काही की., पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | मुके प्राणी आपल्याला जीव लावतात असं आपण अनेक ठिकाणी पाहतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या अनेक व्हिडीओंमध्ये देखील हे पाहायला मिळतं. या व्हिडीओंमध्ये कोणीतरी आपल्या मालकाला मारत असल्याचं पाहून आपल्या जीवाच्या आकंताने कुत्रा आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करतो.

व्हायरल होत असणाऱ्या आताच्या व्हिडीओमध्ये संबंधित कुत्र्याचा मालक जमिनीवर झोपून शवासन करत आहे. मात्र मालकाच्या बाजूला असलेल्या कुत्र्याला आपल्या मालकाला काहीतरी झालं असल्याची भिती वाटते आणि कुत्रा आपल्या मालकाकडे धाव घेतो.

संबंधित कुत्रा सर्वात आधी आपल्या मालकाच्या छातीवर डोकं ठेवून मालकाच्या ह्रदयाचे ठोके चालू आहेत का हे पाहतो. ठोके चालू असून देखील मालक उठत नसल्याने कुत्र्याने त्यांच्या छातीवर मारण्याचा प्रयत्न केला. एवढंच काय तर कुत्र्याने चक्क मालकाच्या तोंडात हवा फुकण्याचा देखील प्रयत्न केला आहे.

दरम्यान, संबंधित कुत्र्याने आपल्या मालकाला वाचवण्यासाठी जमेल तितके प्रयत्न केलं. मात्र अखेर मालकाने शवासन सोडून आपल्या कुत्र्याला जवळ घेतलं तेव्हा कुत्रा शांत झाला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

'गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय'; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

'मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा'

'पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या'; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

'शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा, शिवसेना नसती तर.'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top