Tuesday, 04 Feb, 1.04 pm थोडक्यात

महाराष्ट्र
.म्हणून मी पंकजाला एक पत्र लिहिलं- उद्धव ठाकरे

मुंबई | मराठवाडा पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्गी लावण्यासाठी मी सुचना दिल्या आहेत. म्हणून मी पंकजाला पत्र लिहिलं आहे की तू हा जो मुद्दा काढला आहेस, ऐरणीवर आणला आहे…धन्यवाद! पण त्याबद्दल सरकार संवेदनशील आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पंकजाने हा प्रश्न मांडण्याआधी मी तो मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. ते सामना ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य प्रचंड आहे. मध्यंतरी तर लातूरला ट्रेननं पाणी द्यावं लागलं होतं. त्यामुळे पाण्याचे जे काही प्रकल्प आहेत ते मार्ग लावण्यासाठी मी सूचना दिल्यात, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी उपोषण केलं होतं. या उपोषणाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होतेे.

'नाईट लाईफ' म्हणजे फक्त मौजमजा नाही- उद्धव ठाकरे

मंदिरात श्वानाने गायलं परफेक्ट सुरात अभंग; सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल

यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपला धक्का!

'हिंमत असेल तर मोदींनी निर्णय घेऊन साध्वी, हेगडे यांना बाहेर काढावं'

हेगडे यांच्या वक्तव्यावर भाजपश्रेष्ठींनी माफी मागावी- बाळासाहेब थोरात

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top