Wednesday, 21 Apr, 12.52 pm थोडक्यात

होम
'मी देशासाठी मरतोय, पण.'; पत्नीला बेड न मिळाल्याने BSF जवानाचा आक्रोश

भोपाळ | मध्य प्रदेशातल्या रिवा जिल्ह्यातील एका जवानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. जवान आपल्या पत्नीला घेऊन वणवण फिरला मात्र बेड मिळाला नाही.

येणाऱ्या जाणाऱ्यांकडे जवान मदत मागत आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींकडे त्यानं आपली व्यथा मांडली. त्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी त्याला मदत केली. त्यानंतर त्याच्या पत्नीला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

जवान अवघ्या चारच दिवसांपूर्वी घरी परतला. त्याआधी तो त्रिपुरामध्ये कर्तव्य बजावत होता. जवानानं कोरोनाची लस घेतली आहे. तो घरी आल्यावर पत्नीची प्रकृती बिघडली. मंगळवारी सकाळी पत्नीला रुग्णालयात दाखव करण्यासाठी त्याची वणवण सुरू होती. मात्र अनेक रुग्णांमध्ये जाऊनही त्याला मदत मिळाली नाही. पत्नीला कारमध्ये ठेवून तो प्रत्येक रुग्णालयात जाऊन विचारणा करत होता. मात्र प्रत्येत ठिकाणी बेड नसल्याचं सांगण्यात आलं. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना या जवानाला अश्रू अनावर झाले.

दरम्यान, आजारी पत्नीला घेऊन मी भटकत आहे. तिला कुठे उपचार मिळतील? तिला मी कुठे दाखल करू? मी देशासाठी मरतो. पण माझ्या पत्नीला उपचार मिळत नाहीए, असं म्हणत जवानानं संताप व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

'महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा'; 'या' काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

'मित्राच्या बहिणीसोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये'; लोकांना मोफत ऑक्सिजन देणारा अवलिया

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात

'गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या'; भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डाॅक्टर भारावले

'इतकं लाचार कधीच वाटलं नाही.'; कोरोनाची परिस्थिती सांगताना डॉक्टरला अश्रू अनावर

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top