Saturday, 14 Dec, 7.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
मी पक्ष सोडणार अशा अफवा पसरवल्या गेल्यामुळे मी अस्वस्थ- पंकजा मुंडे

मुंबई | माझ्या मनात खदखद नव्हती परंतु, मी फेसबुक पोस्ट लिहील्यापासून 12 दिवस माझ्याबद्दल ज्या चर्चांना उधाण आलं, खरंतर त्या सर्व चर्चांमुळेच मी अस्वस्थ झाले, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्या एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

विरोधी पक्षनेतेपदासाठी मी आग्रही आहे, अशाही चर्चा रंगल्या. त्या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठीच मी कोअर कमिटीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते, अशी घोषणा केली. 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या 12 दिवसांमध्ये ज्या काही चर्चा रंगल्या किंवा रंगवल्या गेल्या त्यामुळेच मी हा निर्णय घेतला. मी कोअर कमिटीचं सदस्यत्व स्वतःसाठी सोडलं, असं त्या यावेळी म्हणाल्या.

मी भाजप सोडणार नाही, पराभव झाल्याने मी खचून देखील गेलेली नाही. मी अस्वस्थ होते, मात्र आता मला स्वतःला आजमावून पाहायचं आहे, म्हणूनच मी पुन्हा एकदा शून्यावर यायचं ठरवलं आहे, असं त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांचं कर्तृत्व काय?, असा प्रश्न विचारला जातो, आता हाच प्रश्न मला पुन्हा एकदा स्वतःला विचारायचा आहे, त्यामुळेच मी कोअर कमिटीची सदस्य हे जे एकमेव पद होतं त्याचाही राजीनामा दिला, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं.

नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊतांचा शायरीतून…

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; शेतकरी,…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top