Monday, 01 Jul, 3.12 am थोडक्यात

महाराष्ट्र
मोहन भागवत झाले डिजीटल; भागवतांनी केली ट्विटरवर एन्ट्री

मुंबई | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची ट्विटरवर एन्ट्री झाली आहे. @DrMohanBhagwat हे भागवत यांचे ट्विटर यूजर नेेम आहे.

मोहन भागवत यांनी मे महिन्यातच ट्विटर जाॅईन केलं होतं, मात्र जूनमध्ये त्याचं अकाऊंट व्हेरिफाईड झालं. सध्या भागवत यांच्या अकाऊंटला 16 हजार फाॅलोवर्स आहेत. आपले प्रखर विचार मांडण्यासाठी ते आता या डिजीटल माध्यमाचा वापर करतील.

आरएसएसने 2011 मध्ये ट्विटर जाॅईन केलं होतं. या ट्वीटर अकाऊंटला दीड मिलियनहून अधिक फाॅलोवर्स आहेत.

दरम्यान, मोहन भागवत यांच्यासोबतच सरकार्यवाह सुरेश जोशी, सह-कार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, व्ही भगैया, यांनीही ट्विटर जॉईन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारतीय संघाला धक्का; दुखापतीमुळे हा अष्टपैलू खेळाडू विश्वचषकातून बाहेर

-पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंना मोठा धक्का; वंचितकडून 'हा' नेता निवडणुकीच्या रिंगणात!

-तुम्हाला 8 दिवसांत परिणाम दिसतील; रामदास कदम यांचं अजित पवारांना उत्तर

-अज्ञातांकडून औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव 'संभाजीनगर' करण्याचा प्रयत्न

-आपल्याच पक्षाचा भ्रष्ट कारभार चव्हाणांच्या लक्षात आला असावा- सचिन सावंत

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top