Thursday, 27 Jun, 9.28 am थोडक्यात

होम
मुलाच्या गुंडगिरीवर प्रश्न विचारल्यावर भाजप नेते संतापले

भोपाळ | मारकुट्या मुलाबद्दल प्रश्न विचारल्यानं भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी संताप व्यक्त करत पत्रकाराची लायकी काढली आहे.

भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. यासर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पत्रकाराने मुलाचा व्हीडिओ व्हायरल झाल्याची आठवण करून दिल्याने विजयवर्गीय खवळले. माझा मुलगा कोणतंही चुकीचं कृत्य करू शकत नाही, असं विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पत्रकाराने वारंवार प्रश्न विचारल्याने कैलाश विजयवर्गीय यांनी खालच्या पातळीतील भाषा वापरत पत्रकाराला सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-"आणीबाणी लादून इंदिरा गांधींनी विरोधकांना एकजूट होण्याची संधी दिली"

-मंत्री दुष्काळ दौऱ्यावर असताना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहतात- विजय वडेट्टीवार

शिवसेनेचा प्रत्येक मंत्री, आमदार शेतकऱ्यांसोबत दिसायला हवा- उद्धव ठाकरे

-धक्कादायक! बुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार!

-.अन् धोनीचे चाहते सचिन तेंडुलकरवर भडकले

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top