Saturday, 14 Mar, 8.04 am थोडक्यात

महाराष्ट्र
मुंबई सेंट्रल स्थानकाला बाबासाहेबांचं नाव दिलं नाहीतर.; आठवलेंचा सरकारला इशारा

मुंबई | मुंबई सेंट्रल स्टेशनच्या नामकरणावरून वाद चिघळत चालला आहे. अशातच मुंबई सेंट्रलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सरकारला दिला आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस सेक्युलर असेल तर आंबेडकराच्या नावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रान मोकळं मिळालं असल्याचं म्हणत आठवलेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. यानंतर त्यांनी आपल्या गो कोरोनाच्या कवितेवर भाष्य केलं.

आमचा कविता म्हणण्यामागे कोरोना विषाणू देशातून नष्ट व्हावा हाच उद्देश होता. करोनाचे बारा वाजवण्यास आम्ही समर्थ आहोत असंही आठवले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांची एक क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात ते गो कोरोना, कोरोना गो असं म्हणत आहेत. त्यांच्या या क्लिपवर सोशल माध्यामातून मोठ्या प्रमाणात मिम्स बनवण्यात येत आहेत.

परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला प्रमाणपत्राबाबत अक्कल शिकवतात- नितीन राऊत

महाविकासआघाडी सरकारकडून आमदारांना अच्छे दिन; सर्व आमदारांसाठी केली मोठी घोषणा!

.अशा रितीने येस बँकेची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणार!

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनाही भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा लागला!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top