Friday, 13 Dec, 2.40 am थोडक्यात

पुणे
मुंबईतलं 'आरे' शांत होत नाही तोवरच पिंपरी चिंचवड पालिकेने केली झाडांची कत्तल!

पुणे | मुंबईतील 'आरे' प्रकरण शांत होत असतानाच पिंपरीत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं स्वत:च वृक्षसंवर्धनाचे नियम धाब्यावर बसवून झाडांची कत्तल केल्याचं समोर आलं आहे

झाडं तोडताना नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप पालिकेवर होतोय. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी पालिकेच्या कारभाराचा निषेध केला आहे. या सगळ्यांमुळे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी देखील महापालिकेच्या या कारभावर नाराजी व्यक्त केली आहे.

पालिकेनं त्यांच्या परिसरातील झाडं तोडून ठेकेदाराला रान मोकळं करून दिलं आहे. पालिकेनं एक झाड तोडल्यास पाच झाडं लावणार असं सांगितलं होतं. मात्र, प्रत्यक्षात एकही नविन झाडं लावलं नसल्याचं समोर आलंय.

झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी पालिका जलशुध्दीकरण केंद्र उभारणार आहे. विकासकामांना कोणाचाही विरोध नाही. मात्र पर्यावरणाची हानी होऊ नये याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असं पर्यावरणप्रेमींच म्हणणं आहे.

'सीएस' परिक्षेच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल; आज,…

शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top