Tuesday, 19 Nov, 3.52 pm थोडक्यात

होम
"मुसलमानांनी ओवैसींवर विश्वास ठेवू नये"

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपसोबतच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसींवर टीका करायला सुरुवात केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली. अल्पसंख्यांक समाजाने ओवैसींसारख्यांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. बंगालमधील कुचबिहार येथे तृणमूल काँग्रेसच्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

काही माणसं हैदराबाद मधून येतात आणि येथे सभा घेतात. असे लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा दावा करत असले तरी त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी हिंदूंनाही आवाहन केलं आहे. हिंदूंनी कडवट विचारसरणीच्या लोकांपासून दूर रहावं, असं त्या म्हणाल्या आहेत. नागरीक संशोधन विधेयकावरही त्यांनी टीका केली आहे.

युती तुटताच केंद्रिय मंत्री राहिलेले अरविंद सावंत यांची…

बैठका बस्स करा… आता लवकरात लवकर निर्णय घ्या; शिवसेनेची…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>