Thursday, 27 Feb, 3.12 pm थोडक्यात

महाराष्ट्र
'नशीब ते जिवंत तरी आहेत'; न्यायमूर्तीच्या बदलीवरून रिचा चड्डाचा केंद्र सरकारला टोला

मुंबई | प्रक्षोभक विधानं करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?, असा सवाल उपस्थित करणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. यावरून क्रेंद्र सरकारवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका केली जात आहे.

अभिनेत्री रिचा चड्डा हिने देखील एस. मुरलीधर यांच्या बदलीवरुन सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे. नशीब ते जिवंत तरी आहेत, अशा शब्दात रिचाने ट्विटरवरून संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या वरून जे हिंसक आंदोलन सुरु आहे. त्याबाबत रिचा सातत्याने सोशल मीडियाव्दारे व्यक्त होत आहे.

रिचाने न्या. एस. मुरलीधर यांच्याबाबत केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'अटकेपासून वाचण्यासाठी बाळासाहेबांनी आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवल्ली केली होती'

बांगलादेशी-पाकिस्तानी घुसखोरांची माहिती देणाऱ्यास मनसे देणार बक्षिस!

आपला पॅटर्नच वेगळा; सलमान खान करणार 'मुळशी पॅटर्न'चा रिमेक!

धक्कादायक! आप नेत्याच्या घरावर सापडले पेट्रोल बाॅम्ब, गावठी कट्टे, दगडांचा साठा

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे- सुशीलकुमार शिंदे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top