Sunday, 13 Oct, 1.04 am थोडक्यात

होम
'नटरंग'सारखे हातवारे आम्ही करत नाही; मुख्यमंत्र्यांची शरद पवारांवर जहरी टीका

जळगाव | आज सुपर संडे असल्या कारणाने राज्यात सगळ्याच राजकीय पक्षांच्या सभा पडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. नटरंगसारखे आम्ही हातवारे करत नाही, अशा शब्दात त्यांनी पवारांवर तोफ डागली आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

बार्शीमध्ये मुख्यमंत्र्यांवर बोलताना शरद पवार यांनी आक्षेपार्ह हातवारे केले होते. मुख्यमंत्री संपूर्ण राज्यात फिरत विचारत आहेत की शरद पवार यांनी काय केलं? आता काय सांगायचं आम्ही काय केलं, असं म्हणत असताना शरद पवार यांनी विचित्र हातवारे केले. यावरूनच मुख्यमंत्र्यांनी पवारांना लक्ष्य केलं आहे.

शरद पवार यांना माहितीये आपला पराभव होणार आहे. त्याच मानसिकतेतून ते अशा प्रकारचं वर्तन करत आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या प्रचाराचा धुराळा उडाल्यापासून मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली आहे. आता राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या या जहरी टीकेला काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत पंकजा मुंडेंनी शेअर केला आपला निवांत…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top