Friday, 11 Oct, 7.36 am थोडक्यात

होम
नुसत्या पैशाच्या जीवावर निवडणुका लढवता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांचा रोहित पवारांना टोला

अहमदनगर । नुसत्या पैशाच्या जीवावर निवडणुका लढवता येत नाहीत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी शरद पवारांचे नातू रोहित पवार यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. प्रा. राम शिंदे यांच्यासाठी सिद्धटेक येथे पार पडलेल्या विजयसंकल्प सभेत ते बोलत होते.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित पवार राम शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यावर पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचा आरोप होत आहे. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत, तसं असतं तर टाटा, बिर्ला, अंबानी लोकसभा व विधानसभेत दिसले असते, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

जनतेचा आशीर्वाद घेऊन मला विधानसभेत जायचं आहे आणि उरलेली विकासकामं मार्गी लावायची आहेत, असं राम शिंदे यावेळी म्हणाले.

हे पार्सल कुठेही पाठवा पण मुंबईत पाठवू नका- उद्धव ठाकरे

पवारसाहेब, खरा पैलवान कोण आहे तुम्हाला 24 तारखेला समजेल-…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>