Thursday, 12 Mar, 9.52 am थोडक्यात

महाराष्ट्र
ऑपरेशन सांगुन होत नाही, महाराष्ट्रातही लवकरच ऑपरेशन लोटस होईल- पंकजा मुंडे

मुंबई। मध्य प्रदेशनंतर ऑपरेशन लोटस लवकरच महाराष्ट्रात होईल, ऑपरेशन सांगून होत नसतंं, ते होईल तेव्हा सर्वानाच कळेल आहे, असा दावा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणार नाही, असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेनीं म्हटलं होतं. त्यावर बोलताना धनंजय मुंडे एक प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांना राष्ट्रीय पक्षाची भूमिका समजणं शक्य नाही. राष्ट्रवादीत असं ऑपरेशन याअगोदरच झालं आहे आणि हे धनंजय मुंडेंना चांगलंच माहिती असल्याचं म्हणत पंकजा यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षांतील 22 आमदारांनी राजीनामा देऊन ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने कमलनाथ सरकार धोक्यात आलं आहे. यावरून महाराष्ट्रातदेखील ऑपरेशन लोटस होणार असलाचा दावा पंकजा मुंडेंनी केला आहे.

दरम्यान, कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी केवळ मास्क पुरेशे नाही. तापमान वाढत नाही तोपर्यंत जिथे शक्य आहे तिथे लोकांना घरुन काम करायला सांगण्यास काय हरकत आहे, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

ट्रेंड्रिंग बातम्या

ज्योतिरादित्य म्हणजे माझ्या घरी कोणत्याही क्षणी येऊ शकते अशी व्यक्ती होती- राहुल गांधी

'कारस्थानी काँग्रेसवाल्यांनी एका चांगल्या नेत्याची कोंडी केली; राहुल गांधींचं हे मोठं अपयश'

ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा

'.तर ज्योतिरादित्य शिंदेंसारखा नेता भाजपमध्ये गेला नसता

'महाविकास आघाडी अभेद्य, उलट्या वरातीत नाचणाऱ्या भाजपच्या वऱ्हाडी मंडळींनी लक्षात ठेवावं'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top