Thursday, 14 Oct, 9.12 am थोडक्यात

होम
पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

नवी दिल्ली | कोरोना महामारीमुळे सर्वच देशांची अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळल्याचं चित्र आहे. या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने देशाच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र आता कोरोना परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने ही परिस्थिती काही अंशी सुधारताना दिसतेय. पाकिस्तानमध्ये मात्र याउलट चित्र असून पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

जागतिक बँकेने नुकताच एक अहवाल जाहिर केला होता. ज्यामध्ये पाकिस्तानची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली असल्याचं नमूद केलं आहे. सध्या पाकिस्तान कर्जबाजारी तर झाला आहेच. मात्र त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये गरीबी, भ्रष्टाचार, सोयीसुविधांची कमी, गुन्हेगारी यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे पाकिस्तानात लवकरच दिवाळखोरी जाहिर करण्याची वेळ येणार असल्याचं एकंदरीत अहवालातून समोर आलं आहे.

अहवालानुसार, इतर देश किंवा संस्थाकडून सर्वाधिक कर्ज घेतलेल्या 10 देशांमध्ये पाकिस्तानचा देखील समावेश आहे. पाकिस्तानने याआधी चीनकडून चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 22हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र पाकिस्तानला हे कर्ज भरणं शक्य न झाल्याने या कर्जाचा भार वाढतंच चालला होता. त्यामुळे पाकिस्तानने चीनकडे कर्ज माफ करण्याची विनंती केली होती. मात्र चीनने कर्ज माफ करण्यास स्पष्ट नकार दिल्याने पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.

एकंदरीतच पाकिस्तानवर एकीकडे कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. तर दुसरीकडे देशात बेरोजगारी वाढल्याने उत्पन्नाचे साधनही संपुष्टात आले आहे. त्यातच चीनने कर्ज माफ करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानची परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. याआधीची कर्ज भरू न शकल्याने इतर देशांनीही पाकिस्तानसाठी आपली मदतीची दारं बंद केली आहेत. त्यामुळे पाकिस्तानचं हे दिवाळखोरीचं संकट वाढतचं जाणार असं दिसतंय.

थोडक्यात बातम्या-

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

इंधन दरवाढीचा एसटी महामंडळालाही फटका, एसटीने घेतला 'हा' मोठा निर्णय

सोमय्यांच्या 'त्या' संतापावर सचिन सावंत म्हणतात, दुखत्या नसेवर बोट ठेवल्यास.

'एनसीबीची आणखी एक पोलखोल'; नवाब मलिक आज घेणार पत्रकार परिषद

'पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top