Friday, 24 Sep, 11.12 am थोडक्यात

होम
पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या! मोदींच्या भेटीनंतर कमला हॅरिस यांनी दिला पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. यामुळे भारतासाठी हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेतली.

या भेटीत मोदींनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अमेरिकेने केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. तर हॅरिस यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांमुळे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या सुरक्षेवर परिणाम होत आहे. यामुळे हॅरिस यांनी पाकिस्तानला या संघटनांचे समर्थन करणे थांबवण्यास सांगितलं आहे.

पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. या संघटनांवर पाकिस्तानने लवकरात लवकर कारवाई करावी. जेणेकरून भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम होणार नाही, असं हॅरिस यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच कमला हॅरिस यांनी यावेळी भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाचा बळी ठरल्याचं देखील मान्य केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हॅरिस आणि बायडन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रण दिलं. तसेच भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध एक वेगळी उंची गाठतील, असं देखील यावेळी मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या -

'भारताने जे केलं ते कोणीही करू शकला नाही'; सर्वोच्च न्यायालयाने केलं केंद्राचं कौतुक

काय सांगता! अवघ्या 33 हजारांमध्ये मिळतेय बजाज डिस्कव्हर बाईक

आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर भरघोस चुका

मेहबूब शेख प्रकरणावर राजेश टोपे यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट, म्हणाले.

रोहितसाठी नरेन ठरतोय 'गुलीगत धोका'! तब्बल इतक्या वेळा हिटमॅन अडकलाय नरे

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top