Monday, 18 Nov, 3.20 pm थोडक्यात

होम
पक्ष सोडून गेल्यास काय होतं हे साताऱ्यात दिसलंय; अजित पवारांचा उदयनराजेंवर निशाणा

पुणे | पक्ष सोडून गेल्यास काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सर्वांना दिसलंच आहे, असं म्हणत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आता पुढे कुणी पक्ष सोडण्याचा विचार करणार नाही, असंही पवार म्हणाले आहेत.

सध्या आमदार फुटीच्या बातम्या वाचनामध्ये येत आहेत. या बातम्या खोट्या आहेत. अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे फुटाफुट होणार नाही. तसेच पक्ष सोडून गेल्यास काय होतं याचं उदाहरण साताऱ्यात दिसलंच आहे, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढताना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला होता.

'संजय राऊत भाजपशी 'या' फॉर्म्युलावर चर्चा…

राष्ट्रवादीने भाजपच्या मोहजाळात फसू नये- राजू शेट्टी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>