Sunday, 15 Dec, 10.40 am थोडक्यात

महाराष्ट्र
"पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे अहंकारी नेते"

मुंबई | गुरुवारी परळीजवळील गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांनी जे मनोगत व्यक्त केले, त्यात या दोघांनी आपल्या सद्य:स्थितीचे परीक्षण केल्याचं अजिबात जाणवलं नाही, अशा शब्दात संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारत दैनिकातून खडेबोल सुनावले आहेत.

अहंकार खाली पाहू देत नाही आणि खाली पाहिल्याशिवाय आत्मपरीक्षण करता येत नाही. कारण, अहंकारी व्यक्तीला समोरच्याचेच दोष दिसतात. त्यामुळे स्वत:चे काही चुकले का?, स्वत:त काही कमतरता राहिली का, हे बघण्यासाठी संधीच मिळत नाही, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

आपण कुणाला काय दिले, कुणासाठी काय काय केले, हे आपण आपल्या तोंडाने सांगायचे नसते, अगदी राजकारणातही. उलट, ते लोकांना सांगावेसे वाटले पाहिजे आणि आपण, पक्षाने मला किती दिले, याचीच सतत जाहीर उजळणी करायची असते, असंही अग्रलेखात नमूद केलं आहे.

गोपीनाथ मुंडे काय किंवा चंद्रकांत पाटील काय ही मंडळी चळवळीतून समोर आली आहेत आणि जी मंडळी अशी चळवळीतून, संघर्षातून पुढे आलेली असतात त्यांना पक्षही बरेच काही देण्यास उत्सुक असतो, असंही तरूण भारत दैनिकात म्हटलं आहे.

'उद्धव ठाकरे राहुल गांधींना जोडे मारणार नाहीत, कारण…

'शिवसेना नेतृत्वाने गेली पाच वर्षे भाजपची लाचारी केली…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top