Thursday, 19 Mar, 7.52 am थोडक्यात

महाराष्ट्र
पंकजा मुंडे यांच्या शिक्षक बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

मुंबई | भाजप सरकारमधील ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खो दिला असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप सरकारच्या काळात पंकजा मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री या नात्याने जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत ऑनलाइन बदलीचे धोरण आणले होतं.

सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ग्रामविकास विभाग हा हसन मुश्रीफ यांच्याकडे आला. त्यावेळी अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय जाहीर झाला होता.

अभ्यास गटाने बुधवारी आपला अहवाल सादर केला असून त्याचा विचार करून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करेल, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणं अनिवार्य करा- मुरलीधर मोहोळ

पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे दीड लाख मास्क वाटप; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती

कोकणात 'कोरोना'चा शिरकाव; दुबईतून रत्नागिरीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह तिघांवर 1 कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा

खासदार डाॅ. अमोल कोल्हेंनी सांगितला कोरोनापासून वाचण्याचा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top