Sunday, 09 May, 10.28 pm थोडक्यात

महाराष्ट्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

पुणे | सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा सचिव मोहसीन शेख आणि शिवाजीराव जावीर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

सदर गुन्ह्याची तक्रार भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजप सोशल मीडिया संयोजक विनीत वाजपेयी, रुपेश पवार, गौरव शेट्टी ह्यांनी नोंदवली आहे. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी फेसबुक या समाजमाध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो आक्षेपार्हरित्या मॉर्फ करुन तो समाजमाध्यमावर प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्त्वाच्या लौकीकास बाधा आणणारे कृत्य जाणीवपूर्वक करुन त्यांची बदनामी केली आहे. अशा आशयाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला आहे, असं यासंदर्भातील FIRमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मोहसीन शेखने स्वतःच्या फेसबुक प्रोफाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू स्मशानभूमीत यमराजाच्या वेशात प्रेत वाहून नेतानाचा मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केला होता, तसेच शिवाजीराव जावीरने 'चुडिया सस्ती कर दो बाजार में, हिजडे बैठे है यूपी और केंद्र सरकार में' अशा आशयाचा मजकूर टाकून नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांना स्त्री वेशात दाखवले होते, असं पोलिसांकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनामुळं अभिनेत्याचा मृत्यू, मृत्यूपूर्वी लिहिलेली धक्कादायक पोस्ट व्हायरल

बीडमधे पडला असला पाऊस, पाण्याचा लोंढा पाहून अचंबित व्हाल

कोवॅक्सिन ही 12 वर्षांवरील मुलांना देण्यास मान्यता मिळाल्याच्या व्हायरल मेसेज मागचं सत्य वाचा

'उगाच कुणाच्या घरी जाऊ नका, त्यांच्याशी..'; गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला

देशातील 3 राज्यांमध्ये मागच्या 24 तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top