Saturday, 14 Mar, 7.36 am थोडक्यात

महाराष्ट्र
परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला प्रमाणपत्राबाबत अक्कल शिकवतात- नितीन राऊत

नागपूर | ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असं वक्तव्य राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केलं आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

माझ्या आजोबांचे 50 वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र मागवले तर मी देऊ शकतो. पण भटके-विमुक्त लोक प्रमाणपत्र कुठून आणतील? जे स्वत: परदेशातून येथे आले. ते ब्राम्हण आम्हाला अक्कल शिकवतील काय? हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसने 'सीएए','एनआरसी' आणि 'एनपीआर' यास विरोध केला आहे. 2010 मध्ये काँग्रेस सरकारने जो एनपीआर आणला त्यावेळी ज्या अटी व शर्ती होत्या त्याच राहतील तर आम्ही एनपीआर लागू करू देऊ. अन्यथा ते लागू होऊ देणार नसल्याचंही राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी दलित असताना सुद्धा शिक्षणाची संधी मिळाली, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महाविकासआघाडी सरकारकडून आमदारांना अच्छे दिन; सर्व आमदारांसाठी केली मोठी घोषणा!

सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचं केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटं

.अशा रितीने येस बँकेची घसरलेली गाडी पुन्हा रूळावर येणार!

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनाही भारतीय संस्कृतीचा अंगीकार करावा लागला!

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top