Sunday, 22 Nov, 9.04 am थोडक्यात

होम
पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान नव्हे; मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

कल्याण | कल्याणमधील पत्री पुलाचे गर्डर लॉचिंगच्या कामाला सुरुवात झालीये. पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी टीका केलीये.

कल्याण शहरातील पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चंद्रयान लाँचिंग आहे का? अशा शब्दांत आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले, 'पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झालाय. त्याचे गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाहीये. आदित्य ठाकरे यांचे डोंबिवली आजोळ आहे. त्यांनी इतर रखडलेल्या पुलांच्या कामातही लक्ष घातलं पाहिजे.'

ते पुढे म्हणाले, 'पत्री पुलाला जोडणाऱ्या 90 फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकत नाही. या रस्त्याच्या कामाचा जाब विचारायला मी आयुक्तांना भेटायला आलो होतो. मात्र त्यावेळी आमची पोलिसांनी अडकवणूक करण्यात आली. हे फार चुकीचं आहे.'

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

'ही' गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

आयसीसीचा मोठा निर्णय! 'या' वर्षाखालील खेळाडू खेळू शकणार नाहीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

महाराष्ट्रात सरकार आहे की छळछावणी?; आशिष शेलारांचा सवाल

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top