होम
प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरल्याने फेसबुक लाईव्ह करत 'त्याने' आत्महत्या केली!

लखनऊ | प्रेयसीचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न ठरल्याने प्रियकराने मंदिरातून फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. शाम सिकरवार असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी शामने 'सुसाईड नोट' लिहून ठेवली होती. यात त्याने आत्महत्या करत असल्याने कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
मला तिची खुप आठवण येतीये आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. तिचं दुसऱ्या कोणाशी तरी लग्न होतंय हे मला सहन होत नाहीये, असं शामनं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान, शामनं आपल्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर मृतदेहाचे काही फोटो आपल्या फेसबुकवर शेअर करण्याची इच्छा सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.
-"भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात; लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील"
-मी गटारं अन् शौचालय साफ करायला खासदार झाले नाही- साध्वी प्रज्ञा
-शिवसेनाही गाफिल राहणार नाही; आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी- तानाजी सावंत
-काँग्रेसचा 'हा' नेता भाजपच्या वाटेवर?
-"पोलिसांऐवजी अतिरेक्यांनी भ्रष्ट नेत्यांचीच हत्या करावी"