Saturday, 14 Dec, 5.36 pm थोडक्यात

होम
पुढील काही तासांत सलमानच्या घरी बॉम्बस्फोट होणार; अज्ञाताकडून पोलिसांना ई-मेल

मुंबई | अभिनेता सलमान खानच्या घरी बॉम्ब आहे. आणि पुढील 2 तासांत त्याचा स्फोट होईल, अशी खळबळजनक माहिती पोलिसांना ई-मेलद्वारे मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सलमानच्या घरी धाव घेतली.

पोलिसांना सलमानकडे कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने हा मेल खोटा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद या ठिकाणाहून हा मेल पाठवण्यात आला होता. हा मेल पाठवणाऱ्या 16 वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.

4 डिसेंबर रोजी वांद्रे पोलिसांना एक मेल मिळाला. त्यात सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरी बॉम्ब आहे. पुढील दोन तासांत त्याचा स्फोट होईल. रोक सकते हो तो रोक लो. असा मेल आला होता.

दरम्यान, पोलिसांनी संपूर्ण घराची झाडाझडती घेतली. तब्बल 4 तास सलमानच्या घराची शोधाशोध केल्यानंतर पोलिसांनी एकही संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचं समजतंय.

सावकरांना मानणारे आज सत्तेसाठी एवढे लाचार कसे झाले?-…

शेतकऱ्याला कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करायचंय- उद्धव…

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top