Wednesday, 20 Jan, 1.28 pm थोडक्यात

महाराष्ट्र
पुण्यात भाजपसाठी धोक्याची घंटा; 'या' कारणामुळे नगरसेवकांवर ठेवला जातोय वॉच?

पुणे | येत्या महापालिका निवडणुकीत भाजपचे 19 नगरसेवक गडबड करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. गडबड म्हणजे काय तर निवडणुकीच्या महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

या नगरसेवकांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून नजर ठेवण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. भाजपकडे आता महापालिकेत 99 नगरसेवकांचं संख्याबळ आहे.

इतक्या संख्याबळामुळे सर्वांनाच पदे देणं शक्य नव्हतं. मात्र यामुळे नाराजांची संख्या जास्त वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आपले नगरसेवक फुटू नयेत आणि बंडखोरी रोखण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंदोबस्त चालू केला आहे.

दरम्यान, विद्यमान महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्याकडे कायद्यान्वये वर्षभराचा कार्यकाल असला तरी, पक्षाने त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी केली आहे. तर रिपब्लिकन पक्षाला उपमहापौरपद देण्याचा शब्द देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

मराठा आरक्षणावर आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी!

प्रेमविवाह करणारांसाठी खूशखबर; उच्च न्यायालयानं दिला सर्वात मोठा निर्ण

ठाकरे सरकार फक्त टक्केवारीत नंबर वन- अतुल भातखळकर

काँग्रेसने 50 वर्षे विनाशकारी निती अवलंबल्यामुळेच देशातील शेतकरी राहिला गरीब- प्रकाश जावडेक

'शेतकरी आंदोलनात खलिस्तानी एके-47 घेऊन फिरत आहेत'; 'या' भाजप खासदाराचा दावा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top