Monday, 22 Jul, 8.20 pm थोडक्यात

महाराष्ट्र
राज्यभर अजित पवारांच्या वाढदिवसाचा जल्लोष, बारामतीत मात्र विरोधात जोरदार आंदोलन!

बारामती | आज राज्यभर अजित पवारांचा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा होत असताना बारामतीत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं.

आपल्या प्रभागातली समस्या सोडवावी यासाठी आमराई भागातील स्थानिक नागरिकांनी नगरसेविका अश्विनी गालिंदे यांना फोन केला. मात्र त्या फोनवर अश्विनी यांचे पती कुणाल आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. मग कुणाल गालिंदे यांचा पारा चढला. आणि ते डायरेक्ट नगरसेवक असाच नाय झालो. त्यासाठी पैसे फेकलेत, असं बोलून गेले.

कुणाल यांची हीच ऑडिओ क्लिप बारामतीत वाऱ्यासारखी पसरली. इथेच नागरिकांच्या रोषाला वाट मोकळी झाली आणि त्यांनी आज अजित पवार यांच्या वाढदिवशीच बारामती नगरपरिषदेवर मोर्चा काढला.

हमे चाहिये आजादी, राष्ट्रवादी से आजादी. अजित पवार से आजादी. राष्ट्रवादी नगरसेवकों से आजादी. अशा घोषणांनी नगरपरिषद कार्यालयाचे प्रांगण आंदोलनकर्त्यांनी दणादून सोडले. दरम्यान, राष्ट्रवादी पक्ष अशा मुजोरगिरीवर काय कारवाई करणार, हे बघावं लागेल.

-नारायण राणेंची शिवसेनेला काळजी; म्हणतात.

-"मित्रपक्षाने आम्हाला धमक्या देऊ नये, सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात"

-"थोड्याच दिवसात भाजपचे काही मंत्री काँग्रेसमध्ये प्रवेश करतील"

-"आपण दोघं भोजन भाऊ, थापा मारून जिंकून येऊ"

-भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'चांद्रयान 2'चं यशस्वी प्रक्षेपण

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top