Thursday, 27 Jun, 1.12 am थोडक्यात

महाराष्ट्र
"राज्यभर रथयात्रा काढायला तुम्ही स्वत:ला राजा समजता का?"

मुंबई | राज्यभर रथयात्रा काढायला तुम्ही स्वत:ला राजा समजता का?, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. ते विधानपरिषदेत बोलत होते.

रथयात्रा काढण्यापेक्षा दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना जाऊन दिलासा दिला असता तर बरं वाटलं असतं, असं धनंजय मुंडे म्हणाले.

राज्यातील नोकऱ्यांमध्ये 72 हजार पदं उपलब्ध नसताना दीड वर्षात दीड लाख पदं भरण्याची घोषणा करुन सरकार बेरोजगारांची फसवणूक करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीसाठी केलेला उपयोग, विविध पदांची भरती, जीएसटी, उद्योग, गृहनिर्माण क्षेत्र, शाश्वत विकास, मुंबईतील घरे अशा विविध मुद्द्यावर सरकार कसं अपयशी ठरलं, हे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या

-आता माघार नाही, विधानसभा लढवणारच; आशा बुचके आक्रमक

-चंद्रकांतदादा बिनकामाची पाटीलकी सोडून द्या; राजू शेट्टींचा चंद्रकांत पाटलांना टोला

-"मी पुतीन यांच्याशी काय बोलेल, हे तुमचं काम नाही"

-जिमला निघालेल्या काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

-केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई सुरु; एकाला औरंगाबादमधून अटक

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top