
मुंबई | कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे अनेकांचा मृत्यू झाला. अशाच काही एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एकही रुपया मिळालं नसल्याचं अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासूनच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाहीत तोपर्यंत एसटी बस सुरु करणार नसल्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरातील अनेक लाल गाड्या लाॅक आहेत.
हिंगोली, नंदूरबार, वाशिम, सांगली, बुलढाणा या ठिकाणांचा संपामध्ये समावेश झाला आहे. सकाळी 10 वाजता कर्मचारी अचानक संपावर बसल्याने प्रवाश्यांनी तारांबळ उडाली आहे. अनेक प्रवास्यांचे हाल झाले असून अनेकांनी खाजगी वाहतूक मार्ग निवडला.
संपामुळे चारही आगरातून वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाश्यांनी देखील शासनाने कर्मचारांच्या मागण्यांचा विचार करुन त्या मान्य कराव्या, अशी मागणी केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारल्यामुळे प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
दरम्यान, दिवाळी तोंडावर येत आहे. अशातच पेट्रोल-डिझेलचे भाव आभाळाला जाऊन पोहचत आहेत. त्यामुळे एसटी प्रवास महागणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तशी याचिका देखील एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईचा फटका देखील प्रवाश्यांना बसणार आहे.
थोडक्यात बातम्या-
'आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात.', क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
फोन रेकाॅर्ड तपासा, मंत्र्यांची नावं समोर येतील; किरण गोसावीचा खळबळजनक आरोप, पाहा व्हिडीओ
'आजचा मलिक आपल्या राजाचे राज्य धुळीला मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय'
गोसावीचा खरा व्यवसाय काय?, लखनऊला त्याने काय बनाव केला?, पुणे पोलिसांनी सांगितलं सविस्तर