Wednesday, 05 Aug, 10.07 am थोडक्यात

होम
राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन ओवैसींचं एका ओळीचं वादळी ट्विट.!

हैदराबाद | राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक दिवस आज अखेर उजाडला आहे. अयोध्या नगरीत तर दिवाळ सणाला सुरूवात झाली आहे. अनेकांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. अशातच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसींच्या एका ओळीच्या ट्विटनं खळबळ माजली आहे.

राम मंदिर भूमिपूजनाच्या धर्तीवर बोलताना ओवैसी म्हणतात की, बाबरी मशीद तेव्हाही होती, आजही आहे आणि पुढेही राहिल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या तसेच बाबरी मशीदचा जुना फोटो टाकताना त्यांनी 'बाबरी जिंदा है' (#BabariZindaHai) या हॅशटॅगचाही वापर केला आहे.

धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया असून मोदींनी भूमीपूजन समारंभात सहभागी होणं हे त्यांच्या संविधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं मत ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वीच व्यक्त केलं होतं. मात्र भूमिपूजनाला अवघे काही तास शिल्लक असताना ओवैसींनी केलेल्या ट्विटनं वातावरण चांगलंच तापलं आहे.

दरम्यान, बाबरी ही मशीद असून ती कायम राहणार आहे. ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा इतर कुणीही पळ काढू शकत नाही. ज्यावेळी मशीदीत 1949 मध्ये गुप्तपणे मूर्ती ठेवण्यात आली होती. यानंतर 1992 मध्ये मशीद पाडण्याची घटना घडली आहे. आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की, आपली मशीद पाडण्यात आलीय, असंही औवैसींनी यावेळी सांगितलं होतं.

सलग 25 वर्ष आमदारकी भुषवलेले शिवसेना नेते अनिल राठोड यांचं निधन

भीती, भूक, भ्रष्टाचार अन आतंकवाद मुक्त समाजासाठी प्रभु श्रीराम मदत करतील - नितीन गडकरी

'रामायण' मालिकेतील सीता माईला अत्यानंद, म्हणाली यंदा दिवाळी खूपच लवकर आली.!

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Thodkyaat
Top